टेनिसपटू रोहन बोपण्णाने जागतिक क्रमवारीत ११वे स्थान कायम राखले आहे. रोहन बोपण्णाने फ्रेन्च टेनिस खुल्या स्पर्धेत चांगली कामगिरी केल्यास त्याचे क्रमवारीतील स्थान सुधारू शकते.
आतापर्यंत बोपण्णाचे ४९८० गुण झाले आहेत. जागतिक क्रमवारीत लिएंडर पेस हा ५१व्या स्थानावर, पूरव राजा १०२व्या स्थानावर तर साकेत मयनेनी १२८व्या स्थानावर आहे. तर महेश भूपतीने १६६वे स्थान कायम ठेवले आहे. रामकुमार रामनाथन १९९व्या स्थानावर असून सोमदेव देववर्मन ३२६व्या स्थानावर आहे.