दुरहाम(श्रीलंका) येथे सुरू असलेल्या कसोटी सामन्यात श्रीलंकेविरूद्ध खेळताना इंग्लंडचा कर्णधार एलिस्टर कुकने विक्रमवीर सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडीत काढला.
कुकने आंतरराष्ट्रीय कसोटी क्रिकेटमध्ये १० हजार धावा करणारा ‘सर्वात कमी वयाचा खेळाडू’ ठरण्याचा मान मिळवला आहे. कुकचे वय सध्या ३१ वर्षे आणि १५८ दिवस आहे. सचिनने हा टप्पा गाठला; तेव्हा त्याचे वय ३१ वर्षे आणि ३२६ दिवस इतके होते.
या विक्रमासह कसोटीत १० हजार धावा करणारा तो इंग्लंडचा पहिला खेळाडूही ठरला आहे. तसेच १० हजारांचा टप्पा गाठणारा तो जगातील बारावा खेळाडू ठरला आहे.