कोल्हापुरात वडिलांच्या त्रासाला कंटाळून मुलीची आत्महत्या

मुलीने आंतरजातीय विवाह केल्यानं तिच्या वडिलांनीच मानसिक छळ केल्यानं तिनं आत्महत्या केल्याची दुर्देवी घटना कोल्हापुरातल्या जयसिंगपुरमध्ये घडलीये.

13 मे रोजी भाग्यश्रीनं विष पिऊन आत्महत्या केली. स्वप्नील सुरेश पल्लके आणि भाग्यश्री बसगोंडा आवटी यांनी मार्च महिन्यात प्रेमविवाह केला. पण भाग्यश्रीचे वडिल तिला सतत त्रास द्यायचे.

नव-याला सोडून घरी परतण्यासाठी तिला मानसिक त्रास द्यायचे. या त्रासाला कंटाळून तिनं 13 मे रोजी आत्महत्या केली. उपचारांदरम्यान दुस-याच दिवशी तिचाया मृत्यू झाल. भाग्यश्रीचे वडील बसगोंडा आवटी आणि तिचा आतेभाऊ संदिप हुक्किरे यांच्याविरोधीत गुन्हा दाखल करण्यात आलाय.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *