मराठा समाज रस्त्यावर उतरल्यास पाच दिवसात आरक्षण

मराठा समाजात आरक्षणाची धग पेटवण्यासाठी एल्गार मेळाव्याच्या माध्यमातून राज्यभर दौरे सुरू आहेत. राज्यातील मराठा समाज आक्रमकतेने एकाच वेळी रस्त्यावर उतरल्यास अवघ्या पाच दिवसांमध्ये मराठा समाजाला आरक्षण मिळेल, असा विश्वास आमदार नितेश राणे यांनी व्यक्त केला.

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी हुतात्मा स्मृती मंदिरात झालेल्या मराठा आरक्षण एल्गार मेळाव्यात ते बोलत होते. मेळाव्यासाठी उद्योजक अशोक जगदाळे, इतिहास संशोधक श्रीमंत कोकाटे, काँग्रेस जिल्हाध्यक्ष प्रकाश पाटील, जिल्हा परिषदेचे सभापती पंडित वाघ, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष विक्रांत पाटील, भगीरथ भालके आदी उपस्थित होते.

आमदार राणे म्हणाले, एखाद्या समाजाला दिलेले आरक्षण काढण्याची धमक कोणत्याही सरकारमध्ये नसते. आरक्षण काढल्यास समाज पेटून उठण्याची भीती असते. मराठा समाज सोशिक आहे. त्याच्यात एकजूट नसल्याने या समाजाला दिलेले आरक्षण सरकारने काढले आहे.

त्यांनी राष्ट्रपुरुषांची बदनामी करणा-यांचा सन्मान करणा-या सरकारकडून मराठा आरक्षणाची अपेक्षा धरूनका. निवेदने देऊन, भीक मागून आरक्षण मिळणार नाही.

त्यासाठी मराठय़ांचा दरारा व धाक दाखवावा लागेल. मराठय़ांचा दरारा सरकारला लवकरच दाखवू, असा इशारा दिला. यावेळी कोकाटे, काकडे, प्रकाश पाटील, विक्रांत पाटील, संतोष गव्हाणे यांची भाषणे झाली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *