कोलकातासमोर हैदराबादचे आव्हान

आयपीेेएल महत्वपू्र्ण लढतीत रविवारी अव्वल स्थानी असलेला हैदराबाद संघ चौथ्या स्थानी असलेल्या कोलकाता नाईट रायडर्सशी दोन हात करेल. दोन्ही संघांची ही शेवटची मॅच असली तरी प्ले ऑफ फेरीतील आव्हान राखण्यासाठी कोलकात्याला विजय आवश्यक आहे.

हैदराबादने १३ सामन्यातून १६ गूण मिळवले आहेत. त्यांचे बाद फेरीतील स्थान निश्चित झाले असले तरी एकाहून अनेक संघांचे समान गूण समान झाल्यास धावगतीच्या आधारे अव्वल ४ संघ आगेकूच करतील. त्यामुळे डेविड वॉर्मर आणि सहकारी शेवटच्या सामन्यात विजय मिळवण्यासह दिमाखात पुढची फेरी गाठण्याचा प्रयत्न करतील.

कोलकात्याला १३ सामन्यातून १४ गूण मिळवता आले आहे. सध्यस्थितीत ४ संघांचे प्रत्येकी १४ गूण झाले आहेत आणि प्रत्येकाचा एक सामना शिल्लक आहे. त्यामध्ये कोलकात हाही एक संघ आहे. लागोपाठच्या पराभवामुळे कोलकाता संघ चौथ्या स्थानी फेकला गेला आहे. मात्र आणखी एक विजय त्यांना बाद फेरी गाठण्यासाठी पुरेसा ठरुशकतो. मात्र हैदराबादवर केवळ विजय आवश्यक नाही तर चांगल्या रणरेटनी जिंकायला हवे. शुक्रवारी झालेल्या सामन्यात हैदराबादला दिल्लीकडून पराभूत व्हावे लागले. मात्र त्यांना आणखी एक संधी आहे.

वास्तविक पहाता त्यांच्या खात्यात १६ गूण असल्याने तसेच धावगती चांगली असल्याने पुढील फेरी शक्यही होईल. परंतू क्रिकेटमध्ये काहीही घडू शकते. त्यामुळे हैदराबादला गाफील राहून चालणार नाही. दिल्लीविरुध्द हैदराबादची फलंदाजी थोडी ढेपाळली आहे. कोलकात्याविरुध्द त्यांना फलंदाजी उंचवावी लागेल. कोलकात्याची गोलंदाजी चांगली आहे. त्यामुळे डेविड वॉर्नर, शिखर धवन तसेच अष्टपैलू यूवराज सिंग यांना फलंदाजीत चांगले योगदान द्यावे लागेल. हैदराबादकडे भूवनेश्वर कुमार आणि मुस्तफीजूर रहमान हे चांगले मध्यमगती गोलंदाज आहेत. मात्र दिल्लीविरुध्द त्यांनाही शेवटच्या शतकात मार खावालागला. कोलकाताविरुध्द हाणामारीच्या षटकात जास्तीत जास्त धावा जाणार नाहीत याची काळजी हैदराबादच्या गोलंदाजांना घ्यावी लागेल.

कोलकात्याची फलंदाजी मजबूत आहे. सलामीवीर आणि कर्णधार गौतम गंभीर तसेच रॉबिन उथप्पा हे दोघेही चांगले फॉर्मात आहेत. मात्र गेल्या २-३ सामन्यात त्यांना जास्त धावा करणे शक्य झाले नाही. त्यामुळे कोलकात्याची फलंदाजी थोडी कमकुवत झाल्यासारखी वाटते. कोलकात्याकडे आंद्रे रसेल सारखा चांगला गोलंदाज आहे. मात्र हैदराबादची फलंदाजी मजबूत असल्याने कोलकाताच्या गोलंदाजांचा कस रागेल.

वेळ- दु. ४.०० वा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *