धग चित्रपटाचे निर्माते विशाल गवारे यांचे शुक्रवारी मध्यरात्री हृदयविकाराने निधन झाले. ते ३८ वर्षांचे होते.
जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव मधील वरखेडे या गावी शनिवारी सायंकाळी गवारे यांचा अंत्यविधी करण्यात आला.
मिळालेल्या माहितीनुसार, विशाल गवारे यांच्या आजीचे चार दिवसांपूर्वी निधन झाले होते, त्यासाठी ते आपल्या कुटुंबियांसह चाळीसगावला आले होते.
रात्री बाराच्या सुमारास त्यांच्या छातीत दुखू लागले. त्यांना तातडीने खासगी रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
