कबुतर पकडण्याच्या प्रयत्नात तो मजल्यावरून पडला

कबुतर पकडण्याच्या प्रयत्नात तो मजल्यावरून पडला

कबुतर पकडण्याच्या प्रयत्नात इमारतीच्या चौथ्या मजल्यावरून पडून १६ वर्षीय मुलाचा मृत्यू झाला आहे. रविवारी सकाळी कोपरखैरणे सेक्टर १९ येथील कृष्णाई निवास सोसायटीमध्ये ही घटना घडली. इमारतीच्या छतावर मुले खेळत असताना हा प्रकार घडला.

परितोष उबाळे (१६) असे मयत मुलाचे नाव आहे. नुकतेच बांधकाम पूर्ण झालेल्या कृष्णाई निवास या इमारतीच्या चौथ्या मजल्यावरुन पडून त्याचा मृत्यू झाला. मित्रांसोबत खेळत असताना तो या इमारतीच्या छतावर गेला होता. यावेळी परिसरातील त्याचे काही मित्र देखील सोबत होते. इमारतीच्या छतावर गेल्यानंतर परितोष याला त्याठिकाणी एक कबुतर दिसले. हे कबुतर इतर कबुतरांप्रमाणे सहज उडू शकत नव्हते. यामुळे परितोषने त्याला पकडण्याचा प्रयत्न केला. त्याच्या पहिल्या प्रयत्नात कबुतर त्याच्यापासून काहीसे दूर पळाले. यामुळे त्याने दुसऱ्यांदा त्या कबुतराला पकडण्याचा प्रयत्न केला. मात्र कबुतर छतावर अडचणीच्या ठिकाणी जावून बसले असता, त्याला पकडण्याच्या प्रयत्नात परितोष खाली पडला. या प्रकारात गंभीर जखमी होवून त्याचा जागीच मृत्यू झाल्याचे वरिष्ठ निरीक्षक सतीश गायकवाड यांनी सांगितले. कोपरखैरणे पोलीस ठाण्यात सदर घटनेची नोंद करण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *