खांबाळे येथील भैरी तलावाची संपूर्ण स्वच्छता गावातील तरुणांनी श्रमदानातून केली. तलावात निर्माण झालेले शेवाळ आणि घनघचरा बाहेर काढून त्याची विल्हेवाट लावण्यात आली. तरुणांच्या या उपक्रमाचे गावातून कौतुक होत आहे.
खांबाळे येथे भैरी तलाव आहे. या तलावामध्ये पाण्याचा मोठा उद्भव आहे. नळपाणी योजना येथूनच कार्यान्वित आहे; परंतु या तलावात विशिष्ट प्रकारचे शेवाळ आहे. हे शेवाळ संपूर्ण तलाव अवघ्या काही दिवसांत व्यापून टाकते. आतादेखील अशाच प्रकारे हे तलाव शेवाळ आणि अन्य कचऱ्याने भरले होते. दरम्यान, गावातील तरुणांनी हे तलाव स्वच्छ करण्याचा संकल्प केला.
माजी उपसरपंच उमेश पवार, प्रमोद लोके, ज्ञानेश्वर पवार, विलास पवार, रोहित पवार, राज पवार, संदेश पवार, दीपक पवार, तेजस पवार, सोनू गुरव, तेजस चव्हाण, प्रथमेश पवार, आदित्य गुरव, महेश पवार, शुभम पवार, सुदर्शन गुरव, संकेत पवार, अक्षय गुरव, हर्षद पवार, अंबाजी पवार, रितेश पवार, बाळू परब, रूपेश चव्हाण यांच्यासह अन्य तरुणांनी तलाव स्वच्छता मोहिमेला सुरवात केली. तलावातील सर्व शेवाळ बाहेर काढले. याशिवाय आतील कचरादेखील बाहेर काढून त्याची विल्हेवाट लावण्यात आली.