प्रिती झिंटानंतर नेस वाडियाविरुद्ध आणखी एक तक्रार दाखल

उद्योगपती नेस वाडियावर त्याच्या ड्रायव्हरनं गैरवर्तवणूक आणि छळाचा आरोप केलाय.

या प्रकरणी पोलिसांनी अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आलाय. एका वरिष्ठ अधिकाऱ्यानं दिलेल्या माहितीनुसार, तक्रारकर्त्यानं नेस वाडियानं त्यांना (ड्रायव्हर) काल सायंकाळी मुंबईच्या परेलहून दक्षिण मुंबईत फोर्टपर्यंतचं २५ किलोमीटरचं अंतर केवळ १० मिनिटांत कापण्यास सांगितलं.

साहजिकच, १० मिनिटांत ड्रायव्हर तिथपर्यंत पोहचू शकला नाही तेव्हा वाडियानं त्याच्याशी गैरवर्तवणूक करून मारहाण केली. यानंतर ड्रायव्हरनं पोलिसांशी संपर्क साधून नेस वाडियाविरुद्ध तक्रार नोंदवलीय.

अधिकाऱ्यानं दिलेल्या माहितीनुसार, पोलिसांनी वाडियाविरुद्ध अदखलपात्र गुन्हा दाखल केलाय. यासंबंधी प्रतिक्रियेसाठी वाडिया समुहाशी संपर्क होऊ शकलेला नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *