‘एसबीआय’च्या 5 सहयोगी बॅंकांचे कर्मचारी संपावर

भारतीय स्टेट बॅंकेत (एसबीआय) विलीनीकरणाच्या विरोधात एसबीआयच्या पाच सहयोगी बॅंकांमधील कर्मचाऱ्यांनी आज (शुक्रवार) एक दिवस संपावर जाण्याचा निर्णय घेतला आहे.

अखिल भारतीय बॅंक कर्मचारी संघटनेने पुकारलेल्या या संपात एसबीआय किंवा इतर अन्य कोणत्याही सार्वजनिक बॅंकांचे कर्मचारी सहभागी होणार नसल्याचे सांगण्यात आले आहे. मात्र या संपात “एसबीआय‘च्या पाच सहयोगी बॅंकांचे देशभरातील कर्मचारी सहभागी होणार आहे. एसबीआयने सहयोगी बॅंकांसह भारतीय महिला बॅंकेच्या विलीनीकरणाचा प्रस्ताव मंगळवारी मंजूर केला. त्यानंतर तातडीने अखिल भारतीय बॅंक कर्मचारी संघटनेने (एआयबीईए) शुक्रवारी एक दिवसाच्या देशव्यापी संपाची हाक दिली. त्याला आता राज्य सरकारच्या बॅंक कर्मचारी संघटनेने म्हणजेच एसएसबीईएने देखील सहभागी होण्याचा निर्णय घेतला आहे. या पाच बॅंकांमध्ये स्टेट बॅंक ऑफ हैदराबाद, स्टेट बॅंक ऑफ बिकानेर ऍण्ड जयपूर, स्टेट बॅंक ऑफ पटियाळा, स्टेट बॅंक ऑफ त्रावणकोर व स्टेट बॅंक ऑफ म्हैसूर या पाच स्टेट बॅंकेच्या सहयोगी बॅंका आहेत. या सर्व बॅंकांच्या देशभरात विविध ठिकाणी 5,700 शाखा आहेत. तसेच पाचपैकी तीन बॅंका शेअर बाजारात सूचिबद्ध आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *