माधुरी, प्रीतीवर फौजदारी दावा

मॅगी व उत्पादक नेस्ले कंपनी यांना दिलासा मिळण्याची काही चिन्हे नाहीत. जनतेची दिशाभूल आणि जीवाशी खेळ या मुद्द्यांच्या आधारे वॉचडॉग फाउंडेशनने ठोकलेल्या फौजदारी दाव्यात माधुरी दीक्षित व प्रीती झिंटा या अभिनेत्रींच्या नावांचा समावेश आहे. नेस्ले इंडिया व त्यांच्या नऊ संचालकांविरोधात केलेल्या फौजदारी फिर्यादीत या दोन्ही अभिनेत्रींचाही समावेश आहे.

मुंबईतील अंधेरीच्या न्यायदंडाधिकाऱ्यांपुढे दाखल केलेल्या या फौजदारी दाव्यामुळे कंपनीच नाही, तर या ब्रँड अ‍ॅम्बॅसडर अडचणीत आल्या आहेत. माधुरी, प्रीती यांच्याप्रमाणेच अमिताभ यांचे नावही यात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *