भाजपा सरकार सत्तेवर आल्यानंतर राज्याच्या महाधिवक्तापदी नियुक्ती केलेले सुनील व्यंकटेश मनोहर यांनी आपल्या पदाचा मंगळवारी राजीनामा दिला. व्यक्तिगत कारणांमुळे आपण राजीनामा देत असल्याचे मनोहर यांनी सांगितले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी १८ नोव्हेंबर रोजी सुनील मनोहर यांची महाधिवक्तापदी नियुक्ती केली होती. त्यांचा राजीनामा राज्य सरकारने अद्याप मंजूर केलेला नाही. मंत्रिमंडळाच्या बैठकीत यावर निर्णय घेण्यात येणार असल्याचे समजते.
सुनील मनोहर हे ज्येष्ठ विधीज्ञ असून, त्यांनी नागपूर विद्यापीठातून कायद्याची पदवी घेतली आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठामध्ये त्यांनी वकील म्हणून काम केले आहे.
