पंजाब नॅशनल बँकेला मार्चअखेर संपलेल्या तिमाहीत तब्बल ५३६७ कोटी रुपयांचा तोटा झाला असून बँकिंग क्षेत्राच्या इतिहासातील हा सर्वाधिक तोटा आहे. गेल्या वर्षी याच कालावधीत बँकेने ३०१ कोटी रुपयांचा नफा नोंदवला होता.
चौथ्या तिमाहीत बँकेच्या बुडीत कर्जाचे प्रमाण १२.९ टक्क्यांवर गेले असल्याचे बँकेने नोंदवले आहे. डिसेंबर तिमाहीत हेच प्रमाण ८.४७ टक्के होते.
रकमेच्या बाबतीत सांगायचे तर बँकेचे बुडीत कर्ज आता ५५,८१८ कोटी रुपये इतके प्रचंड झाले असून तिस-या तिमाहीत ते ३४,३३८ कोटी रुपये होते.
चौथ्या तिमाहीत बुडीत कर्जासाठी केलेली तरतूद १०,४९० कोटी रुपये इतकी होती. बँक ऑफ बडोदाने डिसेंबरअखेरीस संपलेल्या तिमाहीत ३,३४२ कोटी रुपयांचा तोटा नोंदवला आहे.
