पेशावरमध्ये दोन भीषण बॉम्बस्फोट

पाकिस्तानातील पेशावर शहरात दोन भीषण बॉम्बस्फोट झाले असून यामध्ये एका पोलिसांचा मृत्यू झाला. तर अन्य १९ जण गंभीर जखमी आहेत. हे हल्ले बुधवारी दुपारच्या सुमारास पेशावरमधील माथरा परिसरात झाले.

माथरा परिसरात असलेल्या सुरक्षा वाहनांवर लक्ष्य करून हे हल्ले करण्यात आले. पहिला बॉम्बस्फोट या वाहनावर करण्यात आला असून यामध्ये एका जवानाला आपला जीव गमवावा लागला.

पहिला हल्ला होताच घटनास्थळी पोलीस दाखल झाले आणि त्याचवेळी अचानक दुसरा स्फोट घडवून आणला. यामध्ये काही जवानांसहीत १९ जण जखमी झाले आहेत.

हल्ला झालेल्या परिसरात मोठ्या प्रमाणात सुरक्षा तैनात करण्यात आली आहे. कोणत्याही दहशतवादी संघटनेने या बॉम्बस्फोटाची जबाबदारी अद्यापही स्विकारलेली नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *