मधमाशीने विमानाला आणलं जेरीस, इमर्जन्सी लँडिंग करण्याची वेळ

मधमाशीने विमानाला आणलं जेरीस, इमर्जन्सी लँडिंग करण्याची वेळ

भलंमोठं विमान एका छोट्याशा पक्षाच्या धडकेमुळे कोसळल्याचं वृत्त नवीन नाही. मात्र साऊथेम्प्टनहून डबलिनला जाणाऱ्या एका विमानाला मधमाशीमुळे परतीचा मार्ग धरावा लागला. विमानाचं पुन्हा साऊथेम्प्टनमध्ये लॅंडिंग करण्यात आलं, मात्र सुदैवाने विमानातील सर्व प्रवासी आणि केबिन क्रू सुखरुप आहेत.

अर्ध्या वाटेत असताना संशयास्पद तांत्रिक गुंतागुंतीमुळे फ्लायबेच्या बीई384 च्या वैमानिकाने इमर्जन्सी लँडिंगचा निर्णय घेतला. विमान उतरवल्यानंतर बिघाडाच्या कारणांचा शोध घेताना विमानाच्या मागील भागात मृत मधमाशी आढळली.

द इंडिपेंडंट या वृत्तपत्राने फ्लायबेच्या एका प्रवक्त्याच्या माहितीवरुन हे वृत्त दिलं आहे. मधमाशी एखाद्या प्रवाशाच्या सामानातून किंवा कपड्यांतून विमानात आली असावी, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *