मॅगीमध्ये शिसे आणि तत्सम अपायकारक पदार्थ मिळल्याचा वाद ताजा असतानाच आता शक्तिवर्धक पेय ग्लुकॉन-डीच्या एका पाकिटातही कीडे सापडल्याची तक्रार करण्यात आली आहे. तक्रारीनंतर संबंधित पाकीट तपासणीसाठी पाठवलं आहे.
उत्तर प्रदेशमधील बुलंदशहरातील रहिवासी बबलू यांनी काही दिवसांपूर्वी स्थानिक जनरल स्टोअरमधून ग्लुकॉन-डीचं पाकीट विकत आणलं होतं. ते प्यायल्यानंतर त्यांना आणि कुटुंबियांना उलट्यांचा त्रास सुरु झाला. त्यामुळे बबलू यांनी अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांकडे याची तक्रार नोंदवली.
अन्न सुरक्षा अधिकारी शिवदास यांनी संबंधित दुकानातून ग्लुकॉन डीची पाकिटं तपासणीसाठी ताब्यात घेतली आहेत. पाकिटं लखनऊमधील प्रयोगशाळेत पाठवली असून निष्कर्षानंतर कारवाई करण्यात येईल असं शिवदास यांनी सांगितलं. अमेरिकन कंपनी ‘एच जे हेंज’ ग्लुकॉन डीचं उत्पादन करते.

