सांगलीत स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी वसंतदादा शेतकरी साखर कारखान्याच्या मुख्य कार्यालयाची तोडफोड केली आहे.
दुपारी साडे बाराच्या सुमारास स्वाभिमानीचे काही कार्यकर्ते कारखान्याच्या मुख्य कार्यालयात घुसले आणि तोडफोड केली. या तोडफोडीत कार्यालयातील संगणकांचं मोठं नुकसान झालं आहे.
मागील वर्षीचं थकीत बिल देण्याची मागणी घेऊन हे कार्यकर्ते कारखान्याच्या कार्यालयात घुसले आणि तोडफोड करण्यास सुरुवात केली.

