अयोध्येत राम मंदिराचा प्रश्न अनुत्तरित असला तरी लवकरच इथं एक रामाच्या नावानं संग्रहालय मात्र बनणार आहे. मोदी सरकार अयोध्येत असं एक अत्याधुनिक संग्रहालय बनवण्यावर गंभीरपणे विचार करत आहे.
रामायणातील अनेक गोष्टींना लोकांच्या समोर मांडण्याचा प्रयत्न या माध्यमातून केला जाणार आहे. अयोध्येसाठी रामायण प्रोजेक्ट नावाखाली या मंदिराची निर्मिती केली जाणार आहे.
या प्रोजेक्टचा वादग्रस्त भूमीशी काहीही संबंध नसणार आहे. ही वादग्रस्त जागा वगळूनच या संग्रहालयाची निर्मिती होणार आहे. केंद्रीय पर्यटन आणि पायाभूत सुविधा विकास राज्यमंत्री महेश शर्मा यांनी यासंदर्भातली माहिती दिली.
दिल्लीतील स्वामी नारायण अक्षरधाम मंदिराच्या धर्तीवर या मंदिराची निर्मिती करायचा संकल्प आहे. अयोध्येमध्ये रामाशी संबंधित सगळ्या ठिकाणी पुनरुज्जीवित करण्याचा, या शहराला एक प्रमुख सांस्कृतिक केंद्र बनवण्याचा सरकारचा मानस आहे.
