केजरीवालांना धक्का, दिल्लीचे कायदामंत्री जितेंद्र तोमरांना अटक

केजरीवालांना धक्का, दिल्लीचे कायदामंत्री जितेंद्र तोमरांना अटक

केजरीवाल मंत्रिमंळातील कायदामंत्री जितेंद्र तोमर यांना आज दिल्ली पोलिसांनी अटक केली आहे.  आम आदमी पक्षाचे प्रवक्ते संजय सिंह यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे.  बोगस पदवी प्रमाणपत्र सादर केल्याप्रकरणी जितेंद्र तोमर यांना अटक करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कायदामंत्री चौकशीला योग्य सहकार्य करीत नसल्याने त्यांना अटक करण्यात आली आहे. तसेच त्यांनी आताही जर आम्हाला सहकार्य केलं नाही तर मात्र, आम्हांला त्यांना रिमांडमध्ये घ्यावं लागेल असेही पोलिसांचं म्हणणं आहे.

दरम्यान, ‘आप’ने याबाबत मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. जितेंद्र तोमर यांचं प्रकरण हे न्यायप्रविष्ठ आहे. त्यामुळे त्यांना अशाप्रकारे अटक करणं चुकीचं आहे. मोदी सरकार आम्हाला पोलीस आणि खटले याचा धाक दाखवून घाबरविण्याचा प्रयत्न करीत आहेत. त्यांनी आम्हाला एकदा नाही हजारदा जेलमध्ये पाठवलं तरी आमचा भ्रष्टाचार विरोध सुरुच राहणार.

बिहारच्या एका विद्यापिठाने दिल्ली उच्च न्यायालयात सांगितले की, ‘तोमर यांचे प्रमाणपत्र हे खरे नसून तसा कोणता पुरावाही विद्यापिठात उपलब्ध नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *