झारखंडमध्ये गोळीबारात १२ माओवादी ठार

झारखंडमध्ये गोळीबारात १२ माओवादी ठार

झारखंडमधील पलामू जिल्ह्यात सोमवारी मध्यरात्री पोलीस आणि माओवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत १२ नक्षलवादी ठार झाले. पोलिसांद्वारे सुरू असलेल्या शोध मोहिमेच्या दरम्यान ही चकमक झाली. दोन्ही बाजूने झालेल्या या भीषण चकमकीत पोलीस दलातील कोणीही जखमी झाल्याचे वृत्त नाही.

ठार झालेल्या सर्व १२ माओवाद्यांचे मृतदेह ताब्यात घेण्यात आले आहेत. माओवाद्यांकडून आठ रायफल्स आणि २२० काडतूस जप्त करण्यात आली आहेत.

ही मोहिम झारखंड राज्यातील पलामू येथील पोलीस अधिक्षक मयूर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू होती. दरम्यान येथील जंगलात पोलिसांचे अजूनही शोध मोहिम सुरू आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *