अत्यंत दुर्मिळ अशा छातीत आढळणार्या ट्यूमरने ग्रस्त असलेल्या एका मुलीवर सलग ५ तासाच्या शस्त्रक्रियेनंतर तिची सुखरूप सुटका झाली. बंगळुरूच्या एम. एस. रामय्या नारायणा हार्ट सेंटरने ही कामगिरी केली.
वयाच्या १० व्या वर्षापासून ही मुलगी छातीतील ट्यूमरचा त्रास सहन करत होती. तिच्या छातीत तब्बल ३.२ किलो वजनाचा ट्यूमर होता. यामुळे तिला श्वसनास अडथळा निर्माण होत होता. दोन्ही फुप्फुसांमधील जागेत अशाप्रकारे ट्यूमर आढळण्याची ही अत्यंत दुर्मिळ वैद्यकीय घटना असल्याने अनेक रुग्णालयांनी ही कठीण शस्त्रक्रिया करणे अशक्य असल्याचे याआधीच सांगितले होते, असे या मुलीच्या वडिलांनी सांगितले.
त्यानंतर रामय्या रुग्णालयातील कार्डिओ पल्मनरी बायपास मशीनच्या साह्याने ही शस्त्रक्रिया यशस्वी करण्यात आल्याची माहिती रुग्णालयाचे डॉ. जयंत कुमार दास यांनी दिली.
छातीतील ट्यूमर

