पुणे-मुंबई एक्सप्रेसवर कार अपघात दोन ठार

पुणे-मुंबई एक्सप्रेसवर कार अपघात दोन ठार

पुणे-मुंबई एक्सप्रेसवर लोणावळ्याजवळ आज सकाळी तवेरा गाडीला भीषण अपघात झाला. या अपघातात दोन जण जागीच ठार झालेत. दोन जण जखमी झालेत. हा अपघात १०.३० वाजण्याच्या सुमारास झाला.

पुण्याहून मुंबईच्या दिशेने जात असलेल्या तवेरा कार चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने वेगवान गाडी रस्ता सोडून एका झाडाला धडकली. या अपघातात दोन जणांचा मृत्यू झाला.

यात एका महिलेचा समावेश आहे. तर अन्य दोन जण जखमी झालेत. यामधील एकाची प्रकृती चिंताजणक आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *