हम साथ साथ है! प्रीती झिंटाच्या रिसेप्शनला सलमानसोबत लुलियाही हजर..

हम साथ साथ है! प्रीती झिंटाच्या रिसेप्शनला सलमानसोबत लुलियाही हजर..

बॉलिवूडचा दबंग स्टार अभिनेता सलमान खान आणि त्याची गर्लफ्रेंड लुलिया व्हंतूर हे दोघेही लवकरच लग्नबंधनात अडकणार असल्याची चर्चा जोर धरू लागली असून काही दिवसांपूर्वी लुलिया सलमानच्या कुटुंबियांसोबत एअरपोर्टवरही दिसली होती. त्यामुळे खान कुटुंबियांचाही या नात्याला होकार असून या वर्षाअखेरीस ते दोघे लग्न करणार असल्याचे वृत्त होते. मात्र सलमानने त्यावर कोणतेही भाष्य केले नव्हते.
मात्र अभिनेत्री प्रीती झिंटाच्या रिसेप्शनला लुलियासोबत जाहीर हजेरी लावून सलमानने सर्व चर्चांना पूर्णविराम देत ‘हम साथ साथ है’ असेच स्पष्ट केल्याचे दिसते. दोन महिन्यांपूर्वी अभिनेत्री प्रीती झिंटा बॉयफ्रेंड जेन गुडइनफसोबत विवाहबंधनात अडकली. हा विवाहसोहळा अगदी खासगी स्वरूपात झाला असला तरीही काल (१३ मे) तिने मुंबईतील एका हॉटेलमध्ये प्रीती-जेनचा भव्य रिसेप्शन सोहळा पार पडला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *