सिग्नल यंत्रणेत बिघाड झाल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक पूर्णपणे विस्कळीत

सिग्नल यंत्रणेत बिघाड झाल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक पूर्णपणे विस्कळीत

सिग्नल यंत्रणेत बिघाड झाल्यामुळे शनिवारी पश्चिम रेल्वेच्या वाहतुकीचा मोठ्याप्रमाणावर बोजवारा उडाला आहे. त्यामुळे सध्या पश्चिम रेल्वेची वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. आज सकाळी अंधेरी स्थानकाजवळ सिग्नल यंत्रणेत बिघाड झाला. त्यामुळे अप आणि डाऊन दोन्ही मार्गावरील वाहतुकीवर मोठा परिणाम झाला आहे. तांत्रिक बिघाड दुरूस्त होईपर्यंत चर्चगेट स्थानकावरून कोणतीही गाडी सोडण्यात येणार नसल्याच्या उद्धोषणा स्थानकांवर ऐकायला मिळत आहेत. याशिवाय,  सध्या पश्चिम रेल्वेमार्गावरील ट्रॅक्सवर ट्रेन्सची रांग लागलेली पाहायला मिळत आहे.  त्यामुळे प्रवाशांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *