संत निरंकारी समुदायाचे प्रमुख हरदेव सिंह यांचे कॅनडात एका भीषण अपघातात निधन झाले आहे. संपूर्ण जगभरात निरंकारी बाबांचे लाखो भक्त आहेत. हरदेव सिंह यांच्या अपघाती निधनाच्या वृत्ताने निरंकारी समुदायावर शोककळा पसरली आहे.
हरदेव सिंह ६२ वर्षांचे होते. देशासह जगभरात निरंकारी पंथाची महती पोहोचवण्यात बाबा हरदेव सिंह यांनी महत्त्वाची कामगिरी बजावली होती. कॅनडाच्या मॉन्ट्रियल शहरात एका कार्यक्रमला जात असताना हरदेव सिंह यांची कार पलटी होऊन भीषण अपघात झाला. अपघात इतका भीषण होता की हरदेव यांचा जागीच मृत्यू झाल्याचे समजते.
बाबा हरदेव सिंह यांचा जन्म २३ फेब्रुवारी १९५४ रोजी त्यांचा दिल्लीत त्यांचा जन्म झाला. १९८० साली वडिलांच्या हत्येनंतर हरदेव सिंह निरंकारी संप्रदायाचे सर्वेसर्वा झाले. जगभरातील २७ देशांमध्ये सध्या हरदेव सिंह यांच्या निरंकारी पंथाच्या १०० हून अधिक शाखा आहेत. –