येत्या 3 ते 4 दिवसात मान्सून अंदमानात

येत्या 3 ते 4 दिवसात मान्सून अंदमानात

सर्व देशवासिय ज्याची आतुरतेने वाट पाहात आहेत तो मान्सून पुढील ३ ते ४ दिवसांत अंदमान-निकोबार द्विपसमुहामध्ये दाखल होईल, अशी शक्यता पुणे वेधशाळेने वर्तविली आहे. मान्सूनच्या प्रगतीसाठी पोषक वातावरण असल्यामुळे येत्या काही दिवसांतच तो दक्षिण अंदमान बेटांवर डेरेदाखल होऊ शकतो, असे पुणे वेधशाळेच्या संचालिका सुनितादेवी यांनी म्हटले आहे. मान्सून यंदा नेहमीपेक्षा लवकर दाखल होण्याची शक्यता यापूर्वीच हवामान विभागाने वर्तविली होती. या वेळी सरासरीपेक्षा जास्त म्हणजे तब्बल १०६ टक्के पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

यंदा आबादानी..

गेल्या काही महिन्यांपासून पाणी टंचाईच्या झळा सोसणाऱ्या महाराष्ट्रात यंदा २७ टक्के जास्त पाऊस अपेक्षित असून, कोकण विभागात सरासरीपेक्षा २७.५ टक्के जास्त पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. यंदा पावसाची लक्षणे लवकर दिसू लागली असून, १ जूनपर्यंत कोकणात मान्सून दाखल होईल व ७ ते १५ जूनपर्यंत संपूर्ण राज्यात मान्सून सक्रिय होईल. यंदा जुलै आणि ऑगस्ट या दोन महिन्यात पावसाचा जोर राहणार आहे, असेही हवामान विभागाने यापूर्वी म्हटले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *