मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यातील गाडीचा पाठलाग केल्याप्रकरणी दोन जणांना ताब्यात घेण्यात आलं आहे. गावदेवी पोलिस स्टेशनमध्ये दोघा जणांची चौकशी सुरु आहे.
हाजीअली ते केम्प्स कॉर्नर दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या गाडीचा दोघं जण दुसऱ्या गाडीतून पाठलाग करत होते. दोघं जण केवळ उत्सुकतेपोटी मुख्यमंत्र्यांच्या गाडीचा पाठलाग करुन फोटो काढत असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. संध्याकाळी 7 वाजून 40 मिनिटांच्या सुमारास ही घटना घडली.
संशयास्पद वाटल्यामुळे गावदेवी पोलिसांनी तात्काळ दोघांना चौकशीसाठी ताब्यात घेतलं. मात्र दोघांचीही थोड्याच वेळात सुटका करण्यात येईल असा अंदाज वर्तवला जात आहे.