‘पंतप्रधान नरेंद्र मोदींबद्दल माझ्या मनात आदर उरलेला नाही.’ पंतप्रधानांशी मी संबंध तोडल्याचं जेष्ठ वकील राम जेठमलानी यांनी थेट पंतप्रधानांना पत्र लिहून कळवलं आहे.
केंद्रीय दक्षता आयोगाच्या आयुक्तपदी के.व्ही. चौधरी यांची नियुक्ती झाल्यावर त्यांनी हे नाराजीचं पत्र मोदींना लिहिलं आहे.
के. व्ही. चौधरी यांची दक्षता आयोगाच्या आयुक्तपदी बसण्याची पात्रताच नाही.. आता मी हा लढा सर्वोच्च न्यायालय आणि जनतेच्या वतीनं लढणार असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, केंद्रीय दक्षता आयोगाच्या आयुक्तपदी के.व्ही चौधरी यांची नियुक्ती करण्यात आली. तर विजय शर्मा यांची माहिती आयोगपदी वर्णी लागली. चौधरी आणि शर्मा यांची १ जूनच्या बैठकीत वर्णी निश्चित करण्यात आली होती.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या बैठकीत राजनाथ सिंह, अरुण जेटली, जितेंद्र सिंह आणि विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खर्गे यांचा समावेश होता. चौधरी हे 78 च्या बॅचचे रेव्ह्यूनू अधिकारी असून पहिल्यांदाच एका बिगर आयएएस अधिकाऱ्याची केंद्रीय दक्षता आयुक्तपदी निवड झाली आहे.