09 जून : इस्टर्न फ्री वेवर भरधाव वेगात आलेल्या ऑडीने एका टॅक्सीला धडक दिली. या भीषण अपघातात 2 ठार, तर 3 जण जखमी झाले. इस्टर्न फ्रि वेवर काल रात्री 1.30च्या सुमारास हा अपघात झाला. जखमींना सौफी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
ऑडी कार चालक महिला असून तिने मद्यपान केलं असल्याचेही सांगण्यात येत आहे. या महिलेला पोलिसांनी अटक केली असून याबाबत चौकशी सुरू आहे.
या अपघातात गाडीचा ड्रायव्हर आणि एका प्रवाशाचा मृत्यू झाला आहे, तर तीघांची प्रकृती चिंताजनक आहे. त्यांना सायन रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आलं आहे. आरसीएफ पोलीस ठाण्यात याबाबत गुन्हा नोंदवण्यात आला आहे.