उद्धव ठाकरेंना लीलावती रुग्णालयातून डिस्चार्ज

उद्धव ठाकरेंना लीलावती रुग्णालयातून डिस्चार्ज

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना लीलावती रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला आहे. उद्धव ठाकरेंना सकाळी 7.45 मिनिटांनी रुग्णालयातून सोडण्यात आलं. त्यानंतर ते मातोश्रीवर दाखल झाले.

नियमित तपासणीसाठी (रुटीन चेकअप) उद्धव ठाकरे यांना बुधवारी सकाळी लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं.

युवासेना अध्यक्ष आदित्य ठाकरे यांनी उद्धव ठाकरेंची प्रकृती उत्तम असल्याची माहिती ट्विटरवर दिली. “उद्धव ठाकरेंचं रुटीन चेकअप झालं. तुमच्या प्रार्थनांमुळे त्यांचे रिपोर्ट्स चांगले आहेत,” असं आदित्य ठाकरेंनी ट्विटरवर सांगितलं.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *