सुकमा जिल्ह्यात नक्षलवाद्यांनी दोन वेगवेगळ्या ठिकाणी घडवून आणलेल्या स्फोटांत राज्य राखीव दलाचा जवान शहीद झाला, तर एक चालक जखमी झाला.
याविषयी माहिती देताना सुकमाचे अतिरिक्त उपायुक्त इरफान खान यांनी सांगितले की, आज सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास मराईगुडानजीक स्फोट झाला.
या स्फोटात जवान मकदम जोगा शहीद झाले. केंद्रीय राखीव दलाच्या जवानांसह (सीआरपीएफ) राज्य राखीव दलाचे जवान या भागात नक्षलवाद्यांविरोधात मोहीम राबवित असताना हा स्फोट झाला.
दुसरी घटनाही या भागात घडली. स्फोटात एका खासगी वाहनाचा चालक गंभीर जखमी झाला असून, त्याला येथील एका रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.