शाकाहारी व्हा आणि मांसाहाऱ्यांपेक्षा 4 वर्षे अधिक जगा!

शाकाहारी व्हा आणि मांसाहाऱ्यांपेक्षा 4 वर्षे अधिक जगा!

तुम्ही जर शाकाहारी असाल, तर तुम्हाला मांसाहाऱ्यांपेक्षा चार वर्ष अधिक आयुष्य लाभेल, असे तज्ज्ञांचं मत आहे. जर कुणी जवळपास 17 वर्षांपासून शाकाहारी असेल, तर साडेतीन वर्षांनी आयुष्य वाढतं, असं एका अभ्यासानुसार समोर आलं आहे.

दररोज मांसाहारी अन्न खाल्ल्यास मृत्यू दर वाढतो, असेही एका अभ्यासातून निदर्शनास आले आहे. 15 लाखांहून अधिक लोकांच्या सर्वेक्षणातून समोर आलं आहे की, अधिकाधिक लोकांचा मृत्यू हा दररोज मांसाहारामुळे होतो.

दक्षण-पश्चिम अमेरिकेतील अॅरिझोना राज्यातील मायो क्लिनिकमधील तज्ज्ञांनी एकूण 6 अभ्यासांअंती अहवालामध्ये मांसाहार आणि शाकाहारी अन्नाचा मृत्यू दरावरील परिणामांचा अभ्यास केला आहे.

मात्र, अमेरिका आणि युरोपियन लोकसंख्येच्या अभ्यासादरम्यान थोडं वेगळं पाहायला मिळालं. मांसाहार केल्यास मृत्यू दरात वाढ झालीय, मात्र रेड मीट खाल्ल्यास त्याचा मृत्यू दरावर परिणाम दिसून आलेला नाही.

विशेषत: प्रक्रिया केलेले मांस खाल्ल्याने ही भीती अधिक वाढते. धक्कादायक म्हणजे हृदय रोगासारख्या रोगांची भीतीही वाढते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *