दक्षिण चीनमधील हायड्रोपॉवर या प्रकल्पाजवळ भूस्ख्लन झाले असून यामध्ये २२ जणांचा मृत्यू झाला तर अन्य १७ जण बेपत्ता आहेत. ही घटना सोमवारी दुपारच्या सुमारास घडली.
घटनास्थळी बचाव दल आणि सुरक्षा दलाचे ६०० हून आधिक जवान दाखल झाले आहे. बचावकार्य युद्धपातळीवर सुरू करण्यात आले आहे. मात्र, सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे बचावकार्यात अडथळे निर्माण होत असल्याची माहिती मिळत आहे.
गेल्या काही दिवसांपासून चीनमध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे तेथील जनजीवन विस्कळीत झाले आहे.
भुस्ख्लन झालेल्या परिसरातील नागरिकांना सुरक्षित ठिकाणी नेण्याचे काम सुरू आहे. तर जखमी झालेल्यांना जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात येत आहे.