मी येथेच शेवटचा श्वास घेईन- सोनिया गांधी

“माझे इटलीमध्ये कुटुंबीय आहेत, माझी 93 वर्षांची आई तिथे राहते आणि त्याची मला कुठलीही लाज वाटत नाही,‘‘ अशा कठोर शब्दांत कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या टीकेला प्रत्युत्तर दिले. केरळमधील प्रचार सभेत सोनिया बोलत होत्या.

सोनिया पुढे म्हणाल्या, “मोदी यांनी कितीही टीका केली तरी माझे भारतावर असलेले माझे प्रेम आणि निष्ठा ते हिरावून घेऊ शकत नाहीत. भारत हा माझा देश आहे. मी येथेच शेवटचा श्वास घेईन आणि माझ्या अस्तीही याच मातीत मिसळून जातील. मोदींना माझ्या भावना समजतील, असे मला वाटत नाही; परंतु या देशातील जनतेला माझ्या भावना नक्की समजतील असा मला विश्वास आहे.‘‘ ऑगस्टा वेस्टलॅंड प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर सोनिया यांच्या इटालीयन नागरिकत्वावरून टीका करण्यात आली होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *