नाशिक; सटाणात ट्रकमधील सिलिंडरचा स्फोट

जिल्ह्यातील सटाणा शहरात आज (मंगळवार) पहाटे व्यावसायिक सिलिंडर घेऊन जाणाऱ्या कंटेनरला अपघात झाल्याने पाच ते सात सिलिंडरचा स्फोट झाला. या स्फोटामुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले होते.
 
मिळालेल्या माहितीनुसार, आज पहाटे साडेपाचच्या सुमारास हा अपघात घडला. गुजरातहून सिलिंडर घेऊन आलेला हा कंटेनर सटाण्यातील व्हीपीएन विद्यालयाजवळ दुभाजकाला धडकला. दुभाजकाला धडक दिल्याने तो पलटी झाला आणि संघर्ष झाल्याने सिलिंडरने पेट घेतला. त्याक्षणी पाच ते सात सिलिंडरचा स्फोट झाला. तसेच काही सिलिंडरमधून गॅस गळती झाली. त्यामुळे परिसरातील घरांमध्ये गॅस पसरला होता. नागरिकांनी स्फोटाचा आवाजामुळे घराबाहेर येत सुरक्षित ठिकाण गाठले. अखेर अग्निशमन दलाच्या जवानांनी आग आटोक्यात आणली. कंटेनर सुमारे 50 सिलिंडर होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *