औरंगाबादमधील एमपीएससी पेपरफुटी प्रकरणाचं गौंडबंगाल अखेर उघडकीस आलं आहे. आज एमपीएससीच्या माध्यमातून कर सहाय्यकपदासाठी परीक्षा घेतली गेली..मात्र, हा परीक्षा पेपर फोडला गेल्याचं आमिष आरोपींनी परीक्षार्थींना दाखवलं.
तब्बल ८ जणांकडून कोट्यवधी रुपये लाटले गेले. याप्रकरणी एकूण १४ आरोपींना अटक करण्यात आली आहे. परीक्षेपूर्वीच पेपर मिळवण्याची ही खटपट ८ परीक्षार्थींना चांगलीच भोवली आहे.
औरंगाबादमध्ये काही वेळापूर्वीच एमपीएससीचा पेपर फुटल्याची माहिती समोर आली आहे. आज एमपीएससीद्वारे कर सहाय्यकपदासाठी पेपर घेतला जात. मात्र त्याआधीच हा पेपर फुटल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. मात्र, अद्याप याबाबत अधिकृत माहिती मिळू शकलेली नाही. मात्र याप्रकरणी 14 जणांना पोलिसांनी अटक केली आहे.
औरंगाबादच्या एन-४ भागातून याप्रकरणी १४ लोकांना पोलिसांनी अटक केली आहे. एका व्हॉटसअॅप क्रमांकावरुन मुंबईतून एक पेपर आला होता. आठ विद्यार्थ्यांना हा पेपर सोडविण्यासाठी देण्यात आला होता. औरंगाबादच्या क्राईम ब्रांचला याबाबत माहिती मिळताच त्यांनी धाड टाकून 14 जणांच्या मुसक्या आवळल्या.
आठ विद्यार्थींना जो पेपर देण्यात आला होता तोच आजचा पेपर आहे का याचा आता पोलीस तपास करीत आहेत. तसेच हा पेपर ज्या नंबरवरुन आला त्याचाही पोलीस शोध घेत असून त्याच्या म्होरक्यापर्यंत पोहचण्याचा पोलीस प्रयत्न करीत आहे.