पंतप्रधानांच्या विदेश दौऱयावर 117 कोटी खर्च

पंतप्रधानांच्या विदेश दौऱयावर 117 कोटी खर्च

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विदेश दौऱयावर 2015-16मध्ये एअर इंडियाने 117 कोटी रुपये खर्च केले आहेत. 2014-15 पेक्षा 25 टक्‍क्‍यांनी हा खर्च जास्त झाला आहे, अशी माहिती माहिती अधिकारातून उघड झाली आहे.

सेवानिवृत्त अधिकारी लोश बत्रा यांनी पंतप्रधानांच्या विदेश दौऱयावर झालेल्या खर्चाबाबतची माहिती अधिकारातून माहिती विचारली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2015 ते डिसेंबर 2016 पर्यंत 22 देशांचे दौरे केले आहेत.

माजी पंतप्रधान मनमोहनसिंग यांच्या विदेश दौऱयावर 2013-14 मध्ये 108 कोटी रुपये खर्च झाले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एप्रिल 2015 मध्ये फ्रान्स, कॅनडा व जर्मनी या देशांचा केलेला दौरा सर्वाधिक महागडा ठरला आहे. या दौऱ्यांवर 31 कोटी रुपये खर्च झाले आहेत, अशी माहिती बत्रा यांना देण्यात आली आहे.

पंतप्रधानांचे महागडे दौरे-
एप्रिल 2015- फ्रान्स, कॅनडा व जर्मनी – 31 कोटी खर्च
2014-15- ऑस्ट्रेलिया, म्यानमार – 22 कोटी खर्च
2015- ब्राझील – 20 कोटी खर्च
चीन, मंगोलिया व कोरिया – 15 कोटी खर्च
उज्बेकिस्तान, कझाकस्तान, रूस, तुर्कस्तान, किर्गिस्तान, व ताजिकिस्तान – 15 कोटी खर्च.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *