पंतप्रधान नरेंद्र मोदींचा बांग्लादेश दौऱ्याचा आजचा शेवटचा दिवस आहे. आज सकाळी मोदींनी बांग्लादेशच्या ढाकेश्वर मंदिराला भेट दिली.
ढाकेश्वरी मंदिरामध्ये मोदींनी देवीची पुजाही केली. यानंतर पंतप्रधान मोदींनी ढाक्यातील रामकृष्ण मिशनलाही भेट दिली. यावेळी उपस्थित स्थानिक हिंदू नागरिकांनी मोदींना पहायला गर्दी केली होती. यानंतर मोदी बंग हाऊसमधील क्रेडेंशिअल हॉलमध्ये बांग्लादेशचे राष्ट्रपती अब्दुल हामिद यांची भेट घेतील. त्यानंतर होणाऱ्या सत्कार समारंभात मोदी सहभागी होतील. मोदींच्या या मंदिर भेटीची चर्चा सोशल नेटवर्किंग वेबसाईट ट्विटरवरही जोरदार आहे. ढाकेश्वरी मंदिर हे ट्रेंडिंगमध्ये पहिल्या क्रमांकावर आहे.
या समारंभात भारताचे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांना बांग्लादेशचा सर्वोच्च पुरस्कार फ्रेण्ड्स ऑफ बांग्लादेश लिबरेशन वॉर पुरस्कारानं सन्मानित करण्यात येणार आहे.