डचेस ऑफ केंब्रिजने राजकुमारी शार्लेटचा पहिला अधिकृत फोटो जाहीर केला आहे. या फोटोमध्ये दोन्ही रॉयल भावंडं- प्रिन्स जॉर्ज आणि प्रिन्सेस शार्लेट दिसत आहेत.
केंसिंग्टन पॅलेसतर्फे रविवारी 4 फोटो प्रसारित करण्यात आले. ट्विटराईट्ससाठीही एक फोटो केंसिंग्टन पॅलेसच्या ऑफिशिअल ट्विटर अकाऊण्टवरुन प्रसिद्ध करण्यात आला. प्रिन्स शार्लेट नुकतीच एक महिन्याची झाली. त्यानिमित्ताने दोन वर्षांचा जॉर्ज आणि शार्लेट यांचा एकत्रित फोटो प्रसिद्ध करण्यात आला आहे.
रॉयल फॅमिलीचा मागील अधिकृत फोटो गेल्या वर्षी मार्च महिन्यात प्रसिद्ध करण्यात आला होता. ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर असलेले ड्यूक आणि डचेस ऑफ केंब्रिज, तसंच प्रिन्स जॉर्ज आणि त्यांचा लाडका पाळीव कुत्रा या फोटोत होते.
लंडनमध्ये 2 मे रोजी स्थानिक वेळेनुसार सकाळी आठ वाजून 34 मिनिटांनी राजकुमारी शार्लेटचा जन्म झाला.