मेणबत्ती खाली पडून संपूर्ण घराला आग लागल्याची धक्कादायक घटना उत्तरप्रदेशातील बरेली जिल्ह्यात घडली. या आगीत सहाजणांचा होरपळून मृत्यू झाला. ही घटना शुक्रवारी पहाटे चारच्या सुमारास घडली.
बरेली जिल्ह्यातील किला चावनी गावातील एका कुटुंबातील चार सख्ख्या बहिणींचा आणि दोन चुलत भावांचा या आगीत मृत्यू झाला.
गुरूवारी या मुलांचे आई-वडिल लग्नासाठी दुस-या गावी गेले होते. घरात फक्त भाऊ-बहिणी मिळून सहाजण होते. रात्री झोपतांना अंधार होऊ नये म्हणून यांनी मेणबत्ती लावली. मध्यरात्री हे सहाजण गाढ झोपलेले असतांना मेणबत्ती खाली पडून घराने पेट घेतला.
सकाळी घरातून धूर निघत असल्याने शेजा-यांनी घरामध्ये प्रवेश केला. घटनास्थळी घराचे छत कोसळले होते. आणि त्याखाली सहाजणांचा मृतदेह आढळून आला.

