आरेत अल्पवयीन मुलीवर बलात्कार

आरे परिसरात मंगळवारी दुपारी एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार झाल्याची घटना घडली. पाणी मागण्याच्या सबबीने त्या नराधमाने घरात प्रवेश केला आणि हे घृणास्पद कृत्य केले. याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे.

गोरेगाव पूर्वेकडील पश्चिम द्रुतगती महामार्गावरील एका इमारतीत चौदा वर्षीय पिडित मुलगी तिच्या कुटुंबियांसोबत राहते. आरे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी दुपारी अडीचच्या सुमारास एका पस्तीशीतल्या इसमाने या मुलीच्या घराची बेल वाजवली. त्यावेळी मुलगी तिच्या लहान बहिणीसोबत घरात एकटीच होती. तिने दरवाजा उघडल्यानंतर या इसमाने ‘मी तुझ्या आईसोबत काम करतो आणि तिला ओळखतो.’ असे या मुलीला सांगितले. तेव्हा या मुलीने त्याच्या बोलण्यावर विश्वास ठेवत त्याला घरात घेतले. काही वेळ गप्पा मारल्यानंतर त्याने या मुलीला पाणी आणण्यास सांगितले. ती पाणी आणण्यासाठी स्वयंपाक घरात गेली; तेव्हा तो तिच्या मागे गेला आणि तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. सायंकाळी तिची आई घरी आली तेव्हा तिने घडलेला प्रकार सांगितला.

आरे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विलास चव्हाण यांनी यासंदर्भात सांगितले की, आम्ही याप्रकरणी बलात्कार आणि पॉस्कोअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. फरार इसमाचा शोध सुरु आहे.

>मुलीने पोलिसांना जबाबात त्या इसमाने घरात शिरल्यानंतर मुलीच्या काही नातेवाईकांचीही नावे घेतल्याचे नमुद केले आहे.

त्या इसमाला ओळखत नसल्याचे पोलिसांना सांगितले. त्यामुळे या इसमाने मुलीच्या कुटुंबियांची माहिती काढुन हा प्रकार केल्याचा संशय आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *