सचिन तेंडुलकरांनी दिले सोलापूरला 56 लाख रुपये

सचिन तेंडुलकरांनी दिले सोलापूरला 56 लाख रुपये

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर यांनी खासदार निधीतून सोलापूर जिल्ह्याच्या विकासाला हातभार लावला आहे. सोलापूर जिल्ह्यातील तीन गावांना विकासासाठी 56 लाख रुपयांचा निधी दिला आहे. खासदार तेंडुलकर यांचा निधी जिल्ह्याच्या विकासाला मिळाल्याने ग्रामस्थांमधून आनंद व्यक्त होत आहे.
बार्शी तालुक्‍यातील इर्लेवाडी येथील माध्यमिक शाळेला वर्ग खोल्या बांधण्यासाठी सर्वप्रथम खासदार तेंडुलकर यांच्याशी पत्रव्यवहार करून निधीची मागणी करण्यात आली होती. या पत्र व्यवहाराला तेंडुलकर यांनी सकारात्मक प्रतिसाद देत तीन खोल्यांसाठी 15 लाख रुपयांचा निधी मंजूर केला. हा निधी अपुरा पडत असल्याने या शाळेकडून पुन्हा निधीची मागणी करण्यात आली. या शाळेतील चार वर्ग खोल्यांच्या बांधकामासाठी आता एकूण 19 लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. 
 
दक्षिण सोलापूर तालुक्‍यातील कोन्हाळी येथील सरपंच सुमित्रा बनसोडे यांनीही थेट तेंडुलकर यांच्याशी पत्रव्यवहार केला. गावातील अंगणवाडी, रस्ते, पाण्याची टाकी व पथदिव्यांसाठी निधीची मागणी केली. त्यांनाही तेंडुलकर यांनी 12 लाख रुपयांचा निधी मंजूर केला आहे. करमाळा तालुक्‍यातील पोमलवाडी येथील सरपंच एस. एस. पाटील यांनीही गावाच्या विकासासाठी निधीची मागणी केली होती. पोमलवाडी व पसिरातील रस्त्यांच्या कामांसाठी तेंडुलकर यांनी 25 लाख रुपयांचा निधी दिला आहे. या तिन्ही गावांना निधी मंजूर झाल्याचे खासदार सचिन तेंडुलकर यांचे पत्र सोलापूर जिल्हा नियोजन समितीला मिळाले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *