सिन्नर-शिर्डी रस्त्यावरील अपघातात तीन ठार

सिन्नर-शिर्डी रस्त्यावर इनोवा मोटार आणि ट्रक यांची मिरगाव फाट्याजवळ समोरासमोर जोरदार धडक झाली असून त्यामध्ये तीन जण ठार झाले आहेत.

मुंबईतील साईभक्त शिर्डी येथील साईबाबांचे दर्शन घेण्यासाठी एम एच 02 सी एल 1613 या क्रमांकाच्या इनोव्हा मोटारीने शिर्डीच्या दिशेने जात होते. सिन्नरच्या दिशेने जाणारी ट्रक क्रमांक एम एच 31 सी बी 3080 यांची रात्री एकच्या सुमारास समोरासमोर जोरदार धडक झाली. या अपघातात दोन महिला साईभक्तासह तीन जण जागीच ठार झाले आहेत. मृतांची नावे अद्याप समजू शकलेली नाहीत. अपघाताची माहिती मिळताच वावी पोलिस आणि क्रेन घेऊन किरण पाटील घटनास्थळी पोहचले त्यांनी सागर राजेभोसले, संदीप देशमुख, राहुल पठाडे आदी ग्रामस्थांच्या मदतीने मृतदेह बाहेर काढले. इनोव्हा मोटारीची एयर बैग उघडल्यामुळे चालकाचा जीव वाचला असून मयत साईभक्त मुंबई व गुजरात राज्यातील आहेत. याबाबत वावी पोलिसात अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *