विधवा गर्भवतीचा डॉक्टरवर हल्ला

गर्भवती ठरल्याची माहिती नागरिकांना सांगितल्याच्या संशयावरून विधवा महिलेने रविवारी चक्क डॉक्टवरच चाकूहल्ला केला. ही घटना वर्धाप्पा गल्ली, खासबाग येथे घडली. डॉ. संजय द्विपदराव पाटील (वय 44) रा. राजवाडा कंपाऊंड वडगाव या हल्ल्यात जखमी झाले.

याबाबत पोलिसांतून मिळालेली माहिती अशी, खासबाग येथील विधवा महिला काही दिवसांपूर्वी डॉ.संजय पाटील यांच्या दवाखान्यात उपचारासाठी गेली होती. त्यावेळी डॉक्टरनी ती गर्भवती असल्याचे निदान केले होते. त्यामुळे खात्री करून घेण्यासाठी त्या महिलेने गोवावेस येथील एका डॉयग्नोस्टिक सेंटरमध्ये तपासणी करून घेतली असता ती गर्भवती असल्याचे निदान झाले.

दरम्यान विधवा महिला गर्भवती असल्याची  चर्चा खासबाग परिसरात रंगली होती. ही माहिती त्या महिलेला समजताच तिने डॉ. पाटील यांच्या दवाखान्याकडे धाव घेऊन चाकूने त्यांच्यावर हल्ला केला. यावेळी पाटील यांनी कशीबशी आपली सुटका करून घेतली. याप्रकरणी शहापूर पोलिसांत तक्रार दाखल झाली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *