राजन यांचा पगार चौथ्या क्रमांकाचा

रघुराम राजन हे रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर असले तरी त्यांना या आस्थापनेत सर्वाधिक वेतन मिळत नाही. माहिती अधिकारातून मिळालेल्या माहितीतून रघुराम राजन यांच्यापेक्षा अधिक वेतन घेणार्‍या आणखी तीन व्यक्‍ती आस्थापनेत असल्याचे स्पष्ट झाले आहे.    रिझर्व्ह बँकेने दिलेल्या माहितीनुसार रघुराम राजन यांना 1 लाख 98 हजार 700 रुपये वेतन दिले जाते. त्यांचे मूळ वेतन 90 हजार रुपये असून महागाई भत्ता 1 लाख 1 हजार 700 रुपये आणि इतर भत्त्यांच्या माध्यमातून 7 हजार रुपये राजन यांना दिले जातात. गोपालकृष्ण सीमाराम हेगडे (4 लाख रुपये), अन्‍नामलाई अरापुल्‍ली गौंडर (2 लाख 20हजार 355 रु.), व्ही. कंदस्वामी (2.1लाख रुपये) यांचे वेतन रघराम राजन यांच्यापेक्षा अधिक आहे. रिझर्व्ह बँकेने आपल्या संकेतस्थळावरही ही माहिती प्रसिद्ध केली आहे. ही माहिती जून-जुलै 2015ची आहे. राजन यांच्यापेक्षा अधिक वेतन घेणार्‍या व्यक्‍ती अद्याप रिझर्व्ह बँकेच्या सेवेत आहेत की नाहीत, याचा मात्र खुलासा होवू शकलेला नाही. या तिघांची पदेही बँकेने जाहीर केलेली नाहीत.    हेगडे यांनी मुख्य कायदे सल्‍लागार म्हणून बँकेला सेवा दिलेली आहे. हेगडे आणि कंदस्वामी यांना अदा करण्यात आलेल्या वेतनात मूळ वेतन आणि महागाई भत्त्याची वर्गवारी देण्यात आलेली नाही. रिझर्व्ह बँकेचे प्रवक्‍ते अल्पना किल्‍लावाला यांच्याकडे वारंवार माहिती मागवूनही त्यांनी राजन यांच्यासह इतर अधिकार्‍यांना देण्यात येत असलेल्या ताज्या वेतनाबद्दल माहिती दिलेली नाही.   विशेष म्हणजे किल्‍लावाला हे रिझर्व्ह बँकेत जनसंपर्क खात्यात प्रमुख सल्‍लागार आहेत. त्यांचे वेतन रिझर्व्ह बँकेचे डेप्युटी गव्हर्नर्स आणि 11 कार्यकारी संचालकांपेक्षा अधिक आहे. डेप्युटी गव्हर्नरांना मिळणारे वेतन 1 लाख 73 हजार 900 रुपये असून, कार्यकारी संचालकांना 1 लाख 70 हजार 864 रुपये वेतन दिले जाते.  किल्‍लावाला यांना 1 लाख 78हजार 265 रुपये इतके वेतन दिले जाते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *