शेख हसिनांकडून मोदींच्या आईस साडी भेट

दोन दिवसांच्या बांगलादेश दौऱ्यावर असलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना त्यांच्या आईसाठी बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसिना यांनी खास जामदानी साडी भेट दिली आहे. “ही साडी मोदी यांच्या आईसाठी देण्यात आली आहे‘, अशी माहिती बांगलादेशच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली आहे. बांगलादेशमध्ये ढाकाई जामदानी साडी हे सर्वांत महागडी भेट समजण्यात येते. बांगलादेश भेटीवरील सन्माननीय पाहुण्यांना ती भेट देण्यात येते. मोदींच्या आईसाठी भेट देण्यात आलेली साडी हसिना यांनी निवडली आहे. ती साडी ढाकामध्ये तयार केली त्यावर हस्तकलेचाही वापर करण्यात आला आहे, असेही अधिकाऱ्याने यावेळी सांगितले आहे. अशा प्रकारच्या साडीची किंमत लाखांमध्ये असते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *