मुंबई विमानतळावर आज (शनिवार) सकाळी सुमारे दोन कोटी रुपयांचे सोने जप्त करण्यात आले आहे.
मस्कतहून आलेल्या जेट एअरवेज विमानातून तस्करी करून हे सोने भारतात आणण्यात आले होते. जेट एअरवेजच्या 9 डब्लू-539 विमानातून आलेल्या प्रवाशाने विमानातील प्रसाधनगृहात सोने लपवून ठेवल्याचे चौकशीनंतर उघडकीस आल्याचे, विशेष अधिकाऱ्याने सांगितले.
या प्रकरणी प्रवाशाला अटक करण्यात आली असून, त्याला न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.
