‘‘इतकी वर्षे झाले तरी शेक्सपिअर हे नाव अजूनही जिवंत आहे. म्हणतात ना, काही गोष्टी लगेच संपत नसतात. शेक्सपिअर हे त्यातलेच एक उदाहरण आहे. हे नाव आजवर आपल्या मनावर अधिराज्य गाजवत आले आहे आणि पुढे किती वर्षे गाजवणार आहे, हे आपल्याला माहिती नाही; पण बदलत्या काळातही ते आपल्याला समृद्ध अनुभूती देत राहणार आहे. काहीतरी नवे करू पाहण्याची शक्ती देत राहणार आहे. मात्र आतापर्यंत शेक्सपिअर एकच झाला. दुसरा शेक्सपिअर झालाच नाही. तितकी ताकद दुसऱ्या कोणात दिसलीही नाही. त्यामुळे दुसरा शेक्सपिअर होऊ शकला नाही. हा माणसातला कमीपणा मानायचा का? काही नाटकांत मी भूमिका केल्या असल्या, तरी शेक्सपिअर मला समजला, असे म्हणणार नाही. एक कलावंत म्हणून शेक्सपिअर समजून घेण्याची क्रिया अजूनही सुरूच आहे.
Never play with the feelings of others
Because you may win the game but
the risk is that
You will surely lose the person for lifetime