एकाच कुटुंबातील आठ सदस्यांची निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना ओहियोमध्ये घडली आहे. या सर्वांचे सामूहिक हत्याकांड झाल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली. या हत्याकांडातील आरोपींविषयी अद्याप ठोस माहिती हाती आलेली नाही.
या हत्याकांडामध्ये एका अल्पवयीन मुलासह आठ जणांचा बळी गेला. या सर्वांच्या डोक्यात जवळून गोळ्या झाडण्यात आल्या. तीन लहान मुले या हत्याकांडातून बचावली आहेत. या तिघांचेही वय तीन वर्षांपेक्षा कमी आहे.