चपलांचा ‘प्रसाद’ शिवसेनेचा नाही

चपलांचा ‘प्रसाद’ शिवसेनेचा नाही

भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई यांना चपलांचा ‘प्रसाद’ देण्याची भूमिका ही वैयक्तिक अराफत शेख यांची असून पक्षाने दर्गा प्रवेशासंबंधित कोणतही मत मांडलेले नाही. असे स्पष्टीकरण शिवसेनेच्या नीलम गोऱ्हे यांनी दिले आहे.

हाजी अली दर्ग्यात महिलांना प्रवेश मिळावा यासाठी तृप्ती देसाई आंदोलन छेडणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर शिवसेना उपनेते हाजी आराफात यांनी ‘देसाई यांनी जर दर्ग्यात प्रवेश केला तर त्यांना चपलांचा ‘प्रसाद’ देण्यात येईल’ असा इशारा दिला होता. या त्यांच्या वक्तव्यावर गोऱ्हे यांनी आज पक्षाची भूमिका मांडली.

तृप्ती देसाई यांनी महिलांना हिंदू महिलांना मंदिराच्या गाभाऱ्यात प्रवेश मिळावा यासाठी आंदोलन केले. त्याचा परिणाम म्हणजे शनी शिंगणापूर, त्र्यंबकेश्वर, कोल्हापूरची अंबाबाई आदी मंदिरांच्या गाभाऱ्यात महिलांना देवाच्या दर्शनासाठी प्रवेश जाता येऊ लागले. आता त्यांचा रोख मुंबईच्या हाजी अली दर्ग्यात महिलांना प्रवेश मिळवून देण्यासाठीचा असणार आहे. याबाबत देसाई यांनी २८ एप्रिलपासून दर्ग्याच्या दारात धरणे आंदोलन करण्याचा इशारा दिला. मात्र देसाई यांच्या या आंदोलनाला शिवसेनेचे उपनेते अराफत शेख यांनी विरोध दर्शवत ‘तृप्ती देसाई यांनी जर दर्ग्यात प्रवेश केला तर त्यांना चपलांचा ‘प्रसाद’ दिला जाईल’ असा धमकी वजा इशारा दिला. याबाबत त्यांनी पत्रक प्रसिद्ध केले होते.

अराफत शेख यांच्या पत्रकामुळे आपसूकच शिवसेनेचे नाव जोडले गेले. त्यामुळे नीलम गोऱ्हे यांनी आज अराफत शेख यांच्या भूमिकेशी पक्ष सहमत नसून ‘प्रसाद’ देण्याची भूमिका ही त्यांची वैयक्तिक आहे. असा खुलासा करत देशातील महिलांना धार्मिक स्थळांमध्ये पुरुषांच्या बरोबरीने प्रवेश असावा, यासाठी सेना कधीच विरोधात जाणार नाही, असे स्पष्ट केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *